Research / ऐतिहासिक नोंदी

ऐतिहासिक नोंदी

NO NAME INFO SAN REFERENCE
1 अंताजी रंगनाथ केळकर हा इसम शिवाजी महाराजांनी अंजनवेल तालुक्याचा अंमलदार म्हणून नेमला होता. 7 वर्षे हे काम त्याने केले.... अंताजी रंगनाथ याची कारकीर्द शिवाजी महाराजांच्या कारकीर्दी अखेरीस झाली भा.इ.सं.मंडळ, वार्षिक इतिवृत्त शके 1835 पु. 323.
2 (1) अंताजी राम केळकर, दलाल, बंदर राजापूर. (2) गोपाळ गणेश उर्फ बचंभट केळकर व (3) पांडुरंग बल्लाळ केळकर. अंताजी राम हा शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीचे अखेरीस राजापूर बंदरावर दलालीचे वतन अनुभवीत होता. त्याचे तीन पुत्र प्रौढ होऊन वारले. त्यांच्या नंतर मुलगी होती, ती कृष्णाजी अनंत मराठे यास दिली होती. अंताजीला म्हातारपणी आणखी एक पुत्र झाला. अंताजीची प्रवृत्ती भक्तीमागार्कडे झाली व त्याने रमावल्लभदास संप्रदाय स्वीकारला. गोपाळजींचे मंदिर म्हणजे ठाकुरद्वार त्याने स्थापन केले व त्याच्या पूजे-अर्चेत तो काळ घालवूं लागला. त्यामुळे तो अंतोबा गोसावी या नांवाने प्रख्यात झाला. मृत्युकाळ समीप आल्यामुळे व मुलगा लहान असल्याने आपल्या ठाकुरद्वाराची व्यवस्था मुलगी सुभद्राबाई मराठे इच्या हवाली करण्याचे ठरवून, त्याने आपले दलालीचे वतन, ठाकुरद्वार, घरजागा इ. सर्व जावई व मुलगी यांस दत्त करून दिले. अंताजींचे मृत्युनंतर मोगलाची धामधूम होऊन राजापूर उध्वस्त होऊ लागले. सबब जावई मराठे विजयदुर्गास ठाकुरद्वार घेवून आले. तिकडे बंदराच्या वतनाचा भोगवटा अर्थातच राहिला. अंताजीचा पुत्र अधिष्ठानाचे दर्शनास म्हणून यात्रेस गेला, तो तिकडेच वारला. दरम्यान कान्होजी आंगऱ्यांनी कोकणावर सत्ता प्रस्थापित केली. तेव्हा त्यांचेकडून वतनाचा करार करुन घेण्याची खटपट मराठे यांनी चालविली. इतक्यात पेशव्याची विजयदुगार्वर मोहीम सुरु झाली व त्यात मराठे यांचे वतनाचे साधनिक कागद लुटले गेले. पेशव्यांकडे मराठे यांनी खटपट सुरु केलीच तोच गोपाळ गणेश उर्फ बचंभट केळकर हा वादास उभआ राहिला, व त्याने आपल्या वजनामुळे वतन आपल्या नांवे करुन घेतले. सन इसत्रे सितेनापर्यंत (सन 1961) कृष्णाजी अनंताला काही करता आले नाही. पण पुढे सन इसत्रेमध्ये त्याने भाऊसाहेब पेशवे यांचेकडे तक्रार गुदरली. तेव्हा त्यांनी फेरतपासणीचा हुकूम दिला. आता कदाचित मनसुबी होईल व हातची वतन जाईल या भयाने बचंभटाने व पांडुरंग बल्लाळ केळकर यांनी मराठ्यांशी तडजोड केली. त्यांनी कृष्णाजी अनंताचा हक्क मान्य केला, पण तडजोड म्हणून वतनाचा व इस्टेटीचा निम्मा भाग कृष्णाजी अनंताचा मुलगा नारो कृषेण मराठे यांजकडे चालावा व राहिलेल्या निम्या भागात एक तक्षिम गोपाळ गणेश केळकर व पांडुरंग गणेश केळकर यांनी खावी असे ठरले. इ.स.1762 ऐ.सं.साहित्य खंड 7 लेखांक 29 पृ. 26 वरून.
3 विसाजी गणेश केळकर हा पेशव्यांनी नेमूद दिलेला पवारांचा मुजुमदार होता. सन 1731 साली ऑगस्ट मध्ये चिमाजी अप्पा पेशवे यांनी उदाजी व आनंदराव पवारांचे सख्यत्व करुन दिले. तेव्हां उदाजीचा मुजुमदार म्हणून विसाजी गणेश केळकर यांस करुन समक्ष पाठविले होते. त्या हकीकतीचे विसाजी गणेश यांचे पत्र पे.द. भाग 17, लेखांक 53 वर छापलेले आहे. या विसाजीस इ.स.1738 मध्ये पेशव्यांनी अबदागिरीचा मान दिला. स्वारी पंतप्रधान तिस्सा सलासेन 9 रमजानच्या रोजकीर्दीत तफाते या सदरांत पुढील नोंद आहे. “विसाजी गणेश मुजुमदार दि ।। यशवंतराऊ पवार यांणी बहुत वर्षे स्वामीसेवा केली. त्यास अफतगिर दिले असे.” यांतील ‘बहुत वर्ष’ या उल्लेखावरून सदरहू विसाजी केळकर हा बाळाजी विश्वनाथापासूनही पेशव्यांच्या नोकरीत असावा. इ.स.1731
4 नारायणभट बिन रामचंद्र केळकर व समस्त ब्राह्मण, वास्तव्य मौजे भोगाव श्रीकृष्णा तीर, यांना राजाराम छत्रपती यांनी शके 104 भाद्रपद शु ।। 13 रोजी इनाम पत्राची सनद करुन दिली. त्या अन्वये :- पांडवगडचा हवालदार राणोजी भोसले यांनी किले मजकुरच्या सरंजामापैकी देहाय संमत हवेली प्रांत वाई पैकी जमीन चावर. .।।. मोजे भोगाव. .।।. मौजे येकसर. येकूण हरदू गावी एक चावत जमीन नूतन इनाम करुन दिले. तसेच घरे शाकारावायास सायाची झाडे, चाळीस हजार गवताचे रान व गुरे चारावयास बेरडदऱ्यापासून चार दरे नेमून दिले. पेशवे माधवराव यांनीही त्यास मान्यतापत्रे दिली होती. ती पत्रे पाहून छत्रपतींनी ती इनामे वंशपरंपरा करुन दिल्याची नूतन सनद दिली. 12 साबान सु.।। समान सबैन मया व अलफ. इ.स.1737 य.न.केळकर खाजगी संग्रह.
5 हरभट केळकर “ऐतिहासिक लेख, पारसनीस म्युझियम प्रकाशन, संपादक डिकसळकर,” यातील लेखांक 280 वर सन 1749 मधील मराठी राज्यातील महत्वाच्या लोकांची नाना फडणीस यांच्या दप्तरांतील एक यादी छापली आहे. त्यात हरभट केळकरांचे नाव आहे. इ.स. 1749
6 महादेव भट केळकर यांचेकडे नानासाहेब व भाऊसाहेब पेशवे यांनी शनिवारवाड्यातील काश्मिरी लिंग व नारायण देव यांच्या पूजेचे काम दिले होते. ते त्याने 35 वर्षे केले. नंतर तीच चाकरी त्यांचा मुलगा गणेश महादेव याने 20/25 वर्षेपर्यंत बाजीरावीतही केली. पेशवे दप्तर – टिपणे.
7 बापूभट केळकर 1758-59 साली काशीचे भास्करभट व धोंडदेव वझे यांना नानासाहेब पेशव्यांनी त्रिस्थळीचे उपाध्येपण दिल्याचे पत्र दिले. त्यावर “सगुणाबाई यात्रा करुन पुणियांस आली, त्या समागमे तुम्ही (वझे) व काशीनाथ भट देवधर आले. ते उभयतांचे (वादाचे) वर्तमान मनास आणून शिष्ठ ब्राह्मणांवर मनसुबी दिली...” यातील मनसुबीत म्हणजे न्याय तोडण्यास नेमलेल्या नऊ ब्राह्मणांच्या नावनिशीत बापूभट केळकर काशीकर असे नांव आहे. .स.1758-59 नानासाहेब पेशवे डायरी, प्र.खंड, पृ.117.
8 हरिपंत केळकर पानीपतावर ठार किंवा बेपत्ता झालेल्या लोकात हा होता. तो बऱ्याच मोठ्या मान्यतेचा पुरुष असावा. कारण नाना फडणिसाने पानिपतावरून सिरोजेस परत आल्यावर हरिपंत फडके यांना यादी पाठवून महत्वाचे निकटचे लोक कोण जखमी झाले, कोण परत आले व कोण परत आले नाहीत, हे तपशीलवार कळविले. त्या यादीत न आलेल्या लोकात हरिपंत केळकर यांचे नाव आहे. इ.स.1761 पुरंदरे दप्तर, भाग 1 ला, पृ.313-314.
9 बापूजी महादेव व अंताजी गोविंद केळकर यांची नावे शंकराजी केशव सुरसुभे कोंकण यांच्या दफाते पत्रात आली आहेत. बापूजी महादेव मुलुकगिरी कारकुन व अंताजी गोविंद काडीकुडीकडील कारकून असा उल्लेख आहे. इ.स.1763-64 पे.रो.पहिले माधवराव, दु.ख.पृ। 43.
10 बाळंभट केळकर “बाळंभट केळकर यांचे रुपये एकशेत्रेपन्न आम्ही देणे होते, ते वडिली दिले असतील, नसले दिले तर द्यावे” असा एका पत्रात उल्लेख आहे. इ.स.1774 म.इ.सा.राजवाडे, खंड 10 लेखांक 130.
11 बाळाजी बापूजी केळकर यांना पेशव्यांतर्फे नागपूरकरांकडे मुत्सद्दी कारकून म्हणून इ.स. 1770 साली पाठविण्यात आले. यांनी मुक्काम पद्मावती परगणे धोबज येथून, नागपूरकरांकडील भागडीचा अहवाल पेशव्यांकडे पाठविला आहे. इ.स.1770 पे.द.भाग 20, पृ. 287
12 बाळाजी बापूजी केळकर हे पेशव्यांतर्फे दादासाहेबांवरील मोहिमेत मुत्सद्दी म्हणून सामील होते. त्यांचे ता. 11.5.1775 चे मुक्काम कामरेज येथील पत्र आहे. त्यांत इंग्रजांचा दुसऱ्यांदा झालेला पराभव वगैरे माहिती आहे. इ.स.1775 पे.द.भाग 26, पृ.177
13 बाळाजी बापूजी केळकर हे पेशव्यांतर्फे दादासाहेबांवरील मोहिमेत मुत्सद्दी म्हणून सामील होते. त्यांचे ता. 11.5.1775 चे मुक्काम कामरेज येथील पत्र आहे. त्यात इंग्रजांचा दुसऱ्यांदा झालेला पराभव वगैरे माहिती आहे. इ.स.1775 पे.द.भाग 26, पृ.177
14 नारायणभट केळकर यांना नारायणराव पेशव्यांच्या उत्तरकार्यात गंध दानाबद्दल रु.10 दक्षिणा मिळाली. इ.स.1773-74 पे.रो.पहिले माधवराव, भाग 1, पृ.79-93
15 कृष्णंभट व पांडुरंगभट केळकर कृष्णंभट यांना तूपदानाबद्दल रु.20 व पांडुरंगभट यांना तिलपात्रदानाबद्दल पेशवे सरकाराकडून रु.14.8.0 मिळाले. इ.स.1773-74 पे.रो.पहिले माधवराव, भाग 1, पृ.79-93
16 रामचंद्रभट केळकर सवाई माधवरावांच्या जन्मोत्सवाचे वेळी देवब्राह्मणास देकार वाटण्यात आला. छ 7 मिनहू. त्यात 34 ब्राह्मण होते. त्यात रामचंद्रभट केळकर हे एक होते. दर आसामीस एकेक पुतळी देण्यात आली. इ.स.1773-74 पे.रो.सवाई माधवराव, भाग 1, पृ.76
17 बापूजी आप्पाजी केळकर यांची सव्वादोन वर्षाची मुलगी सातारच्या सदाशिवभट करमरकराने जबरदस्तीने धरून नेली व गोपाळ कृष्ण कानिटकरांच्या मुक्या मुलांशी तिचे लग्न लावून दिले. म्हणून करमरकर व कानिटकर यांची घरे वस्तभावसुद्धां जप्त करावी व त्या उभयतांचे घरांस बहिष्कार घालावा असा हुकूम पेशव्यांनी दिला. इ.स.1775 पे.रो.सवाई माधवराव, भाग 3, पृ.103
18 गणेश रघुनाथ केळकर यांना माधवराव नारायण (नगरकर) यांचे ता. 24.5.1775 चे पत्र – राजश्रीया विराजीत राजमान्य राजश्री गणेश रघुनाथ केळकर स्वामी गोसावी प्रती सेवक माधवराव नारायण नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणे विशेष. ‘तालुके नगर येथील जमीदाराची रुसुम व इनामसुधा सालमजकुरी येक साला ऐवज सरकारात द्यावयाचा करार करुन राजश्री बालाजी कृष्ण ठोसर यांजकडे खास चौकीचे लोकास सालगुदस्ताचे नालबंदीपौ रूपये 1850 साडे आठरासे देविले आसोन तर पावते करुन पावलियाचे कबज घेणे’ म्हणोन हुजूर आज्ञापत्र सादर जाले. त्यास ता. मजकूर येथील जमीदाराचे रुसमाचा आकार देखील इनामसुद्धा रु.1751 सत्राशे एकावण जाहाला. त्याच्या हुंड्या तुम्हाकडे आलाहिदा पाठविल्या आहेत. त्यास सदरहु सत्राशे एकावम रुपये मुदतीप्रो सावकाराकडून घेऊन राजश्री बालाजी कृष्ण यांजकडे पावते करून तालुके आमदानगर येथील जमीदारावर रुसुम व इनामसुद्धा वरात सरकारातून साडेअठराशे रुपयाची जाली होती. त्यापैकी सत्राशे एकावन्न रुपये भरुन पावले म्हमोन कबज लिहून घेणे. हुंड्यात मुदती दाहा दिवसाच्या आहेत. छ 25 2 ।। खर सु ।। सीत सबैन बहुत काय लिहणे हे विनिती. पैवस्ती मिती आषाढ शु.।। दशमी शुक्रवार शके 1697 मन्मथ नाम सबछरे सदरहु प्रो साडेअठराशे रुपयापैकी सत्राशे एकावन रुपये ता।। अंताजी कृष्म कारकून दि।।म।।रनिले. बेदपरड (?) याजकडून परभारे देविले असेत ब।। कबज घेतले असे. इ.स.1775 नगरकर दप्तर.
19 बाळाजी हरि केळकर हा इसम तोतयाच्या बंडात तोतयास सामील होता. इतर 10 लोक व बाळाजी असे सिंहगडावर होते. पुढे तोतयाचा मोड झाल्यावर या लोकांनी तुकोजी होळकरांमार्फत पेशव्यांशी बोलणे लावून, गड पेशव्यांचे स्वाधिन करण्याचे मान्य केले. सबब पेशव्यांनी 23 जिल्हाद रोजी त्यास अभयपत्र दिले. इ.स.1776-77 पे.रो.सवाई माधवराव भाग 2, पृ. 136.
20 सदाशिव रघुनाथ केळकर हे नाना फडणिसांजवळ कारकून पेशातले पण मुत्सद्दी ग्रुहस्थ होते. नाना यांना महादजी शिंदे यांजकडे वकीलीसारख्या कामासही पाठवित. महादजी शिंदे यांच्या दरबारांतील पेशव्यांकडील रोजनिशी लिहिणारा ता. 23.5.1777 रोजी लिहितो, “छ 15 रोजी दो प्रहरा सरकारचा ग्रहस्थ सदाशिव रघुनाथ केळकर आले. गुरुजींस येऊन भेटले. येकांत जाला. आबा गुरूजींचे नातू बालरायांकडे गेले, मग पाटीलबाबाकडे उभयंता गेले.” या केळकरांचे एक पत्र ऐतिहासिक लेख – पारसनिस म्युझियम प्रकाशन पृ. 12 वर छापलेले आहे. सदाशिव रघुनाथ यांना पालखीचा मान होता असे 8 नंबरच्या पत्रावरून दिलते. इ.स.1777
21 घनश्याम बापूजी केळकर इ.स.1778 साली कोंकण प्रांती तोतया निर्माण झाला. त्याने नारिंग्रेकर वासुदेव जिवाजी बापट यांचे घरी चौकी बसविली व पुढे बापटास वाडा जून येथे मोरोपंत भावे यांचे घरी जप्तीस पाठविले. ती जप्ती करुन मोजदादीचे यादीप्रमाणे वस्तवानी तोतयाकडे राजमाचीस नेऊन दिली. पुढे पेशव्यांनी बापटास कैद करून पुण्यास 8/10 महिने ठेविले. शेवटी बापटाने भावे यांना रु.350 देण्याचे कबूल केले. वाडा जून येथून नेलेली चीजवस्तू सर्व तोतयाचे हवाली केली. बापटांजवळ काही नाही अशी खातरजमा चाल लोकांच्या सोक्षमोक्षाने करुन देण्यात आली. त्यात घनश्याम बापूजी केळकर हा एक साक्षीदार आहे. इ.स.1778 पत्र वासुदेव जिवाजी बापट यांचे भावे यांस आषाढ बहुल सप्तमी शके 1700 चे.
22 बाळाजी अनंत केळकर सीम समासीन मया व अलफ मोहरम 10 तारखेच्या खचार्त पुढील नोंद आहे. ‘बालालिंग नाईक यंस व लक्ष्मण गुरव सुपेकर यांस सालगु।। वाड्यात दशावतारी खेळ करविला त्याबद्दल, बाळाजी अनंत केळकर कारकून शिलेदार यांजकडून त्यांस कापड देवविले.’ इ.स.1785 पे.रो.सवाई माधवराव, भाग3, पृ.300.
23 विसाजी गोपाळ केळकर शके 1710 विसाजी गोपाळ केळकरांच्या गुजारतीचा कृष्णाजी सुर्वे राजवाडीकर तोतयाचे वेळेस नवी सरदारी करून बरोबर लोक घेवून तोतयाकडे चाकरीस राहिला होता. सबब त्याजकडून 35 रु. गुन्हेगारी घेतली. हा केळकर व राजवाडीकर हे संगमेश्वर तालुक्यातील होते. इ.स.1788 राजवाडे भ.इ. साधने खंड पृ.228
24 अंताजीपंत केळकर हा अंजनवेल सुभ्याच्या सुभेदाराचा कारभारी म्हणून शके 1711 नंतर काही दिवस होता. इ.स.1789 इतिहास संग्रह, ऐ.टिपणे, पृ.20.
25 बाळाजी अनंत केळकर हा सन 1792 मध्ये पेशवे दप्तरात कारकून शिलेदार होता. ता. 25.1.1792 रोजी शिमग्याचे वेळी पेशव्यांचे वाड्यापुढे निरनिराळ्या शाहीर व गोंधळ्यांनी, सोंगाड्यांनी हजेरी लाविली. त्या सर्वांना पेशव्यांनी जी बिदागी नक्त व पोषाकाची दिली ती सर्व या बाळाजीपंत केळकरांच्या हस्ते दिली होती, असे पेशवे दप्तर भाग 43 लेखांक 18 वरून दिसते. हा बाळाजीपंत सवाई माधवरावांचा विशेष आवडता होता. होळीच्या व रंगपंचमीच्या सणाची अत्यंत तपशीलवार हकीगती देणारी दोन पत्रे इतिहास संग्रहात छापलेली आहेत. त्यावरून बाळाजीपंतांचा पुढाकारही कळून येतो. पहिल्या पत्रातील एक वाक्य असे – “जेठीची लढाई लावली. दोघेही समतुल्यच राहिले. 10 घटिका दिवसपर्यंत खेळ जाहला. मग श्रीमंत तेथून उठले. खेळात पुढाईत बाळाजीपंत ठोसर व बाळाजीपंत केळकर हे दोघे.” दुसऱ्या पत्रातील एक वाक्य असे - ‘चार घटिका नाच होऊन मग रंगास आरंभ केला. श्रीमंतांनी आपले हाते चिरकाडीने कार्यकारण यांचे अंगावर रंग घातला. मग बाळजीपंत ठोसर व केळकर यांनी सर्वांचे अंगावर घातला. तदनंतर रंगाची व गुलालाची रेल जाली.’ इ.स.1792 इतिहास संग्रह, ऐ.टिपणे पृ. 57-59
26 बाळाजीपंत (अनंत) केळकर हे पेशव्यांच्या सेक्रेटरिएटमध्ये किती महत्वाचे गणले जात हे पुढील उदाहरणावरून समजते. इ.स. 1795 मध्ये खर्ड्याच्या लढाईत निजामाचा पराभव केल्यानंतर तहाच्या वाटाघाटीत निजामाकडून पेशव्यांना 1 लक्ष 50 हजार रुपये दरबार खर्च मिळाला. त्यातील 31,500 निसबत सरकार म्हणून निरनिराळ्या 14 लोकांना देणग्या किंवा दरबार खर्च मिळाला. त्यात बाळाजीपंत केळकर यांस 1000 रुपये मिळाले. इ.स.1795 इतिहास संग्रह, ऐ.टिपणे, पृ.44-46.
27 महादेवभट व महादजीपंत व गणेशपंत केळकर तुळशीबागेतील राममंदिरातील वार्षिक उत्सव प्रसंगार्थ निमंत्रण द्यावयाच्या प्रतिष्ठित लोकांच्या यादीत वरील तीन केळकरांची नावे आहेत. इ.स.1712 पुणे नगर – संशोधन – वृत्त, खंड 3, पृ. 258.
28 बाळाजीपंत व लक्ष्मणपंत केळकर नाना फडणीसांच्या मेणवली दप्तरात सुरु अरबा तिस्सैन मया व अलफची, ‘पुण्यातील गृहस्थ मंडळी’ ची अकारविल्हेने केलेली एक यादी आहे. त्यात ही दोन नावे आहेत. इ.स.1793-94 इतिहास – संग्रह, ऐ, टिपणे, भाग 6, पृ. 2 – 8.
29 जनादर्नभट व भिकंभट केळकर पृ.55. - हे घराणे डुबेरकर बर्व्यांचे उपाध्ये. शके 1716 चे सुमारास मल्हारराव भाऊसाहेब बर्वे यांनी डुबेर येथून पुण्यास स्थायिक होण्यास प्रयाण केले, त्यावेळी बरोबर जनार्दनभट यांसही नेले. पृ.62.- भिकंभट केळकर, कोठूरकर बर्व्यांच्या पाटिलकीचीहि वहिवाट करीत होते. पृ.68. .... भिकोबातात्यांनी लक्ष्मीनारायण पंचायतनाच्या मूर्ती घेतल्या होत्या, त्यांचे देवालय बर्वे यांनी डुबेर गावात जनार्दनबट यांचे हातून बांधविले. इ.स.1794 बर्वे घराण्याचा इतिहास
30 बाळाजी अनंत केळकर पेशव्यांकडून विजयादशमीचे पोषाख सनगे निरनिराळ्या लोकांना पावली, त्यात बाळाजी अनंतास 75।। रुपयाचा पोषाख मिळाला. इ.स.1795 पे.रो.सवाई माधवराव, भाग 3, पृ.327
31 बापूभट केळकर .स.1797-98 साली पेशव्यांनी पर्वतीच्या रमण्यात व गावात दक्षिणा वाटली. त्याखेरीज गावातील थोर पंडीतास निरनिराळी दक्षिणा दिली. त्यात बापूभट यांना 20 रु. दक्षिणा मिळाली. इ.स.1797-98 पे.रो.दुसरा बाजीराव, पृ.230-34.
32 बाळाजी लक्ष्मण केळकर ऐ.सं.साहित्य खंड 3 मध्ये पृ.277 वर पुणे प्रांतातील कामगारांची नावे व वेतनाची रक्कम दिलेला कागद छापला आहे. त्यात ‘सुभे निसबत’ कारकुनाचे यादीत बाळाजी लक्ष्मण केळकर हे नाव असून त्याची नेमणूक 200 रुपये आहे.
33 बाळाजी नाईक केळकर पुण्यातील सुप्रसिद्ध खुन्या मुरलीधराचा हल्ली जो लाकडी सभामंडप आहे तो आणि गाभाऱ्यात देवावर जी लाकडी मेघडंबरी आहे ती बाळाजी नाईक यांनी बांधली. देवाचा श्रावण मासातील दहा दिवसांचा वार्षिक उत्सवहि तेच करीत. परंतु पुढे देवाच्या इस्टेटीच्या समाइक मालकीचा तंटा सुरु झाल्याने केळकरांनी उत्सवातून आपले अंग काढून घेतले... केळकरांकडून उत्सवातील नेवैद्य समर्पण केला जातो. इ.स.1802 पुणे नगर संशोधनवृत्त, खंड 2, पृ.140
34 बाबाजीपंत केळकर इ.स.1802 साली लोहगड किल्ल्याचे कारभारी धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या पदी हे मुत्सद्दी होते. नित्सुरे यांनी 8 सप्टेंबर 1802 रोजी मुंबईच्या गव्हर्नरला जे पत्र लिहले त्यांत बाबजीपंतांस बोलणी करण्यासाठी पाठविल्याचा उल्लेख आहे. नित्सुरे – कुल - वृत्तांत, पृ.155. इ.स.1802
35 भिकंभट केळकर कोठुरे येथील भागवत बंधूंच्या आईने जीव दिला. तेव्हा कोठुऱ्याच्या भिकंभट केळकराने त्या दोघा बंधूवर दोष ठेवून त्यांना अपंक्त केले. नंतर एक वर्षाने भागवतांनी नाशकास जाऊन, प्रायश्चित्त करुन व दंड देऊन शुद्धिपत्र घेतले. इ.स.1806 ऐ.सं.सा.खंड 1,पृ.181
36 विसाजी लक्ष्मण बाबा केळकर हे आबोली ता. सुवर्णदुर्ग येथील राहाणारे यांना इ.स.1808 मध्ये राजापूर प्रांताचे मुख्य ठाणे तळे येथे सुभेदार करुन पाठविले. “पुन्हा विसाजी लक्ष्मण बाबा केळकर यांहीच मामलत करुन ओक यांची सनद छ 4 सवाल (कार्तिक शु।। 6 = 1809 सप्टेंबर 22) ... घेऊन रवाना केली. ती छ 20 जिल्काद (1809 डिसेंबर 29) मार्गशीर्ष व।।7 तळ्यास मोरोपंत घेऊन आले. पुढे माहे मजकुरी बाबाही आले. भटाकडे मापलत जाली होती. परंतु घोसाळगड व मानगड दोन किल्ले केळकर यांजकडे होतेच. हाली सालीम मामलत फिरोन ती छ 7 सवाल (इ.स. 1810 नोव्हेंबर 5) ... पर्यंत मारनिल्हेकडे चालली. उपरांत मराठी यांजकडे जाली. केळकर यांनी माहाडची मामलत केली तिकडे निघोन गेले.” इ.स.1808 ऐ.सं.साहित्य, खंड 3, पृ.89-95
37 पांडुरंग लक्ष्मण केळकर हा शके 1736 ते 39 च्या दरम्यान रामचंद्र नगरकर यांच्या तर्फेने अंजनवेल सुभ्याचा कारभारी होता. इ.स.1814 भा.इ.सं. इतिवृत्त शके 1835, पृ.338 व 341.
38 परशुरामभट व सदाशिवभट केळकर दुसऱ्या बाजीरावाने पुण्याजवळ फुलशहर वसविले. तेथे घरे बांधण्याकरिता कोणाकोणास पैसे दिले त्याची यादी आहे. त्यात पुढील उल्लेख आहे – “यादी सरकारकडून ब्राह्मणास ऐवज घरास दिल्हा त्याची नावनिसी. सुरु सबा असर मयातैन व अलफ त्यात परशरामभट केळकर यांस 2000 रु. मिळाले आहेत. त्यानंतर परशुरामभट यांचे नाव “घरे मात्र तयार केली. परंतु येथे रहात नाही.” या सदरात आहे. ” “यादी मौजे फुलगाव येथील ब्राह्मणांची घरे नवीन सुरु समान अशा मयतैन व अलफ शके 1739 ईश्वरीनाम सवछरेची” आहे. त्यात एका सदाशिवभट केळकरांचे नाव आहे. “भाया मात्र भरतात. वस्ती येथे नाही” या सदरात ते नाव आहे. इ.स.1816-17
39 बापू केळकर बाजीरावाची बायको वाराणशीबाई हिच्या अंगात गंगाधरशास्त्राचे भूत आले होते, त्या प्रकारचे वर्णन पत्रात लिहितांना “परंतु वरदीप्रमाणे वद्य 9 शनिवारी तिसरे प्रहरी राजश्री बापू केळकर येऊन खलबत करुन गेले” असा उल्लेख आहे. त्यावरुन तो पेशवे कुटुंबात घरोबा असणारा कोणी आप्त किंवा आश्रित दिसतो. त्राची तारीख छ 23 जिल्हेज (25 ऑक्टोबर 1818) अशी आहे. इ.स.1818 पे.द.भाग, 41 पृ.132
40 गणेश धोंडदेव केळकर हे शके 1750 चे सुमारास पुणे येथे डनलॉप साहेबांचे हाताखाली मुख्य होते. त्यांचेबद्दल पुढील उल्लेख आहे. – “डुंबऱ्यावरून कारकून पुण्यास श्रावणमासी गेला. साहेबांची भेट (होऊन) मग श्रुत केला. गौरनरसाहेबजवळ दंडलापसाहेब मुख्य काम पाहणारे होते. पुणे मुक्कामी हुकूम जाला नाही, स्वारी साताऱ्यास जाण्यास निघाली. गणेश धोंडदेव केळकर साहेबांजवळ होते. ते स्वारीबरोबर निघाले. त्याजला दंडलापसाहेबांनी सांगितले. बर्वे यांचे प्रकर्ण बरोबर घेणे.” इ.स.1828 बर्वे घराण्याचा इतिहास, भाग 1, पृ.64.
41 गणेश गंगाधर केळकर हे सोमेश्वराचे राहणारे असून सन 1830 साली बोंड्ये गावचे अमीन होते. इ.स.1830 कॅ.डॉवेल्स सर्व्हे ऑफ ओल्ड रत्नागिरी तालुका सिलेक्शन, नंबर CCXVII न्यू सेरीज, पृ.24.
42 विष्णुपंत बर्वे नावाचे बडे अधिकारी सन 1842 पासून 1884 पर्यंत पुण्यात होते. त्यांच्या हाताखाली केळकर नावाचे गृहस्थ उदयाला आले होते. “स्वारी पंतप्रधान सुरुसीत तिसैन मया व अलफ माह र बिलाखर छ 13 (27.10.1795). 28 रु. प्राणोत्क्रमण सायंकाल अस्तमानसमई तिलपात्र सुवर्ण शाळग्रामसहित दान नारायणभट केळकर नेवरेकर यांस दिल्हे त्यास दक्षणा मोहरा पंच मेल नाणे 2 दर 14 प्रो रुपये” वरील नोंदीतील दान सवाईमाधवराव पेशव्यांच्या प्राणोत्क्रमण प्रसंगी केलेल्या दानापैकी आहे. इ.स.1842 इ.स.1795 बर्वे घराण्याचा इतिहास, पृ.140
43 शके 1767 साली सातारकर छत्रपतींनी तुला केली व त्याचे द्रव्य पुण्यात वाटले. दर असामीस 1 रुपयाप्रमामे एकूण 1300 रुपये वाटले. त्यात पुढील नांवाचे केळकर होते – 1) कृष्णभट 2) गोपाळभट 3) गोविंदभट 4) दाजीभट 5) नारायणभट (यांचे स्वतःच्या मालकीचे घर होते) 6) नारायणभट (बिऱ्हाड आप्पा चिपळूणकर) 7) नारायणभट (बिऱ्हाड नारसाचे देऊळ) 8) महादेवभट 9) मोरभट 10) यज्ञेश्वर 11) विनायकभट 12) वैजनाथभट 13) विठ्ठलभट 14) सदाशिवभट 15) वामनभट पुराणिक केळकर 16) नारायण. इ.स.1845 य.न.केळकर खासगी संग्रह.
44 पांडोबा भाऊ केळकर यांचे घर कसब्यात पेठे यांचे वाड्यासमोर होते. पांडोबा त्या घरात शके 1776 च्या नंतर पौषात वारले. नंतर ते घर पेठे यांनी 820 रु. स विकत घेतले, व नंतर विसोबा आण्णा बेपारी यांनी 1150 रु. स विकले. विसोबा यांनी ते घर मोडून टाकले. इ.स.1854 भा.इ.सं.मं.इतिवृत्त शके 1835. पृ.399.
45 नारायणभट त्र्यंबक व बापूभट विश्वनाथ केळकर ता. 11 मे 1827 रोजी श्रीवर्धन आणि हरेश्वर येथील 21 रहिवाशांनी अल्फिस्टनकडे अर्ज केला की, “बाजीराव बल्लाळ यांनी कोठिंबे ता. नरसापूर या गावी अर्जदारास 132 चाऱ्याची इनाम दिली... सध्याचे कलेक्टर मे. सिंप्सन भोगवटा होऊन देत नाहीत. आणि पेशवे सरकारची शिक्याची सनद दाखवा म्हणतात. ही सनद पेशव्याचे वेळी कल्याण प्रांती जो दंगा झाला त्यात नष्ट झाली. या सनदेची नक्कल पेशवे दप्तरात व कलेक्टरसाहेबांचे कागदात आहे. तरी.... सिंप्सन साहेबांना भोगवट्यास हरकत करु नका असे कळवावे.” इ.स.1827 डोंगरे कुलवृत्तांत, पृ.21
46 सदाशिव गणेश केळकर वस्ती वाडा फणसे, मौजे वाडे तर्फे खारेपाटण तालुके विजेदुर्ग, याणे गोविंदभट पौठण, वस्ती वाडा मजकूर यांची कन्या गुणाजी गणेश केळकर वस्ती मौजे वानिवडे, तर्फे मजकूर यांस दिली होती, ती जिवे मारली म्हणून हुजूर म्हणून विदित जाहले; त्याजवरुन येविशीची चौकशी करता गुणाजी गणेश याची बायको मारल्याचा मुद्दा सदाशिव गणेश केळकर याजकडे लागू होतो. सबब यास कैद करुन बराबर गाडदी निसबत राघो विश्वनाथ गोडबोले असामी 4 देऊन बिडीसुद्धा किल्लेवंदन येथे अटकेत ठेवावयाकरिता पाठविली असे. तरी किल्ले मजकुरी पक्के बंदोबस्ताने अटकेस ठेवूनपोटास शेर शिरस्तेप्रमाणे देत जाणे म्हणोन नारो शिवदेव यांचे नावे सनद 1 रसानगी यादी. पे.रो.सवाई माधवराव भाग 3, पृ.87.
47 सदाशिव गणेश केळकर वाडा फणसे मौजे वाडे; तर्फे खारा पाटण, तालुके विजेदुर्ग याणी हुजुर विनंती केली की “गुणाजी गणेश तिवरेकर मौजे वानिवडे तालुके मजकूर यांची स्त्री मारल्याचा आरोप मजकडे आला सबब किल्ले वंदन येथे सरकारकडून मजला अटकेस दहा वर्षे ठेविले होते. त्यास हल्ली मोकळे केले. परंतु प्रायश्चित्त द्यावयाचे देऊन शुद्ध केले नाही. याजकरिता स्वामींनी कृपाळू होऊन जीननमाफक राजदंड घेवून प्रायश्चित्त द्यावयाची आज्ञा करुन, मजला दोषापासून मुक्त केले पाहिजे म्हमोन”. ऐशियास गुणाजी गणेश तिवरेकर याची स्त्री मारल्याचा आरोप केळकर मजकूर याजकडे आला होता. सबब याजपासून राजदंड व ब्रह्मदंड घेऊन सर्व शिष्ट सभेत विध्युक्त प्रायश्चित्त देववून शुद्ध करुन हे पत्र सादर केले असे, तरी तुम्ही तालुके मजकूरचे ब्राह्मणास ताकीद करुन सदाशिव गणेश यांसी अन्नव्यवहार करी ते करणे, म्हणोन चिटणिसी पत्र.
48 धोंडो गोपाळ केळकर हा तोतयाचे फितुरात होता म्हणून यास बेडी घालून धनगड किल्ल्यावर अटकेत ठेवला होता. – “धोंडो गोपाळ केळकर किल्ले धगनड येथे अटकेत आहे, त्याचे पाय सुजले आहेत. उठवत बसवत नाही. म्हणोन तुम्ही विनंतिपत्र पाठविले ते पाविले. ऐशियास मशारनिल्हेत फार बरे वाटत नाही, याजकरिता पायातील बिडी तोडून औषध उपाय करणे, आणि चौकीचा बंदोबस्त चांगला करुन लोकांचे फेरफार वरचेवर करुन बरा जाहला म्हणजे फिरोन पायात बिडी पूर्ववत घालणे म्हणोन;” गोविंद रघुनाथ किल्ले यांचे नांवे पत्र पेशवे सरकारचे (नोंद क्रमांक 976 (445).) धोंडो गोपाळ केळकर, तोतयाचे फितुरांतील, किल्ले धनगड येथे आटकेस होता. तो मृत्यू पावला. त्याची क्रिया जाइली पाहिजे, याजकरिता त्याची बायको तालुके रत्नागिरी येथे अटकेस आहे. तीस जामीन घेवून क्रिया करण्याबद्दल मोकळीक करणे. क्रिया जाहलीयावर पोटी संतान असल्यास अटकेस ठेवणे. संतान नसेल तर जामीन पक्का घेऊन मोकळीच असो देणे” म्हणोन सदाशिव केशव यांचे नांवे छ 8 रबिलाखर परवानगी रा. बळाजी जनार्दन फडणीस. पे.रो.सवाई माधवराव, भाग 3, पृ.142
49 केळकर नावाचे गृहस्थ नारोपंत जोशी इचरकरंजीकरांचे पूर्वज याचे उपाध्याय होते. 1701 साली नारोपंतांनी आपले पुत्र व्यंकटराव यांची मुंज केली. त्यावेळी त्यांनी आपल्या उपाध्यायास बोलावणे केले. परंतु ते वेळेवर हजर होऊ शकले नाहीत म्हणून नारोपंतांनी त्याच वेळी त्यांचे उपाध्ययेपण काढून ते पटवर्धन सरदारांचा पूर्वज हरभट म्हणून होता त्यास दिले. गोपाळराव पटवर्धन चरित्र चरित्र, ले.रा.अ. लागू, पृ.7.
50 विनायक यशवंत केळकर पुणे यांची बायको बाळकृष्ण विनायक टिल्लु क्रमवंत यांची मुलगी. क्रमवंत घराण्याचा इतिहास, ले.ग.दा.टिल्लू, परिशिष्ट, पृ.8
51 विश्वनाथभट केळकर सांगली, यांची मुलगी वासुदेव हरभट पेंडसे यांस दिली होती. याच पेंडशांची काशी नांवाची मुलगी धुंडिराजपंत उर्फ तात्यासाहेब सांगलीकर यांची प्रथम पत्नी होय. पेंडसे – कुल – वृत्तांत, पृ. 240
52 नारायणरावांचा खून व सवाई माधवराव याची आत्महत्या या दरम्यानच्या 20 वर्षांच्या काळात नारो हरी केळकर हा राजकार्य मसलतीत होता. अप्पाजी महादेव केळकर मामलेदार व गणोजी गणेश केळकर पागेवरचा सरदार असे होते. कृष्णाजी शामराव – सन 1802 – 1803 मध्ये इंग्रजांशी बाजीरावाचा तह झाला तेव्हा तो कृष्णाजी शामराव व वरील नारो हरी, अप्पाजी महादेव व गुणाजी गणेश हे कंटाळून आपापले अंग काढून घरी निघून गेले. पुढे सन 1815-1816 चे सुमारास गणेश बाबूराव केळकर मामलतीवरून पळून आला तो ढोकमळ्यास दडून राहिला. इत्यादि जुनी ऐकीव हकीगत वानिवड्याचे महादुकाका केळकर यांनी कळविली आहे. गुणाजी गणेश केळकर हा बहुदा फौजबंद – सरदार असावा. याच्याबद्दल अशी आख्यायिका सांगतात की तो वानिवड्यास येई तो घोड्यावरुन स्वार शिबंदीसह येई. वानिवड्याचे मूळ मराठे लाड नावाचे होते. ते फार पुंड होते. पुढे त्यांनी आपले नांव धुरीमिराशी असे चालू केले. हे लोक वानिवड्यास वसाहत केलेल्या केळकर मंडळीस जमीनी करु देईनात. सबब या गुणाजी गणेशाने त्यांचा पुंडावा जबरदस्तीने मोडून काढून केळकरांच्या वसाहती निर्वेध केल्या.
53 बाळाजी लक्ष्मण केळकर 717 रुत. हे बाळाजी लक्ष्मण तालुका व विष्णू गोपाळ राजश्री आप्पासाहेबांचे लग्न ब।। ब्राह्मण भोजनाकडे खर्च, पृ. 24. ब।। याद व ।। 30 गु।। आप्पाजी गंगाधर (ज्येष्ठ). 12।।। नामे बाळाजी लक्ष्मण केळकर व विष्णू गोपाळ खोत श्रीमंत राजश्री आप्पासाहेबांचे लग्नाबा ।। ज्येष्ठमासी ब्राह्मणभोजनाकडे पाकशाळेस दूध ब।। याद. 1000 रु. (जेष्ठमास) जमा प्रांत पुणे बाळाजी ल7मण केळकर व विष्णु गोपाळ दातार खोत राजश्री आप्पासो चे लग्नाचे ब्राह्मण भोजनाकडे साहित्यास हुजूर पोत्याहून देविले ते. 45 रु. बाळाजी लक्ष्मण केळकर व विष्णु गोपाळ खोत रो। विनायकराव यांचे मुंजीबा। ब्राह्मण भोजनाकडे खाद्या पासोड्या घुवट वार 30 दर 1।। प्रो। (माघ) सन 1789-96 तुळशीबागवाले जमाखर्च पृ. 140
54 श्री. राजश्रीया बिराजित राजमान्य राजश्री आत्या गुरुजी स्वामीचे शेवेसी. पो।. रामचंद्रराव महादेव सा। नमस्कार विनंती येथील कुशल ता। छ ।। जिल्हेज जाणौन स्वकीये कुशल लिहीत असले पाहिजे विशेष. वाडा गावडे आंबेर ता। पावस तालुके रत्नागिरी येथी कुलकर्ण्यांचे वतन आमचे. आमचे ठिकाणाचे पायीठ्याचे खाजण त्याचा कौल केळकर वाडा मार याणी घेऊन बंदिस्ती केली. त्याचा कौल भरलीयावर आमचे खाजण आम्ही घेतले. त्याविसी केलकर याणी कर्जिया करुन बांधावरून नारळ लाविले. त्यावरून त्यांचा व आम्हां कुलकर्ण्यांचा खटला पडोन हुजूर जाबसाल पडला. तो मा। कैलासवानी महादजीपंत गुरजी याणी मनास आणून हुजुरुन कारकून पाठवून केळकर याणी माड लाविले ते काढून टाकिले. केलकर याचा वेध ठेविला नाही. आमचे खाजण आम्हाकडे निर्वध चालत आहे. हाली केळकर वादाचा उद्योग करणार म्हणोन ऐकिण्यात आले. यास्तव आपणास लिहिले आहे. येविसी आपलेहि ध्यानांत असेलच. परंतु गुरुजीबाबा यांचे वेलेस जाहत्याचा मजकूर लिहिला आहे. केळकर बालू लागल्यास ताकीद व्हावी. नगरकर दप्तर.
55 हरि विश्वनाथ केळकर व वामन विनायक केळकर या नावाचे दोन इसम आद्य महाराष्ट्र नाटकार विष्णुपंत भावे यांच्या कंपनीत होते. विष्णुदास भावे चरित्र. ले.वा.भ. भावे पृ.131
56 धोंडोपंत मंडलिक (दुसऱ्या बाजीरावाचे श्वशुर) यांची दुसरी स्त्री गंगा, हिजपासून 5 मुली झाल्या. त्यापैकी एक गव्हे येथील केळकर यांजकडे दिली होती. मंडलिक चरित्र पृ.9
57 बाजी गणेश केळकर यांचा उल्लेख कुंचारखाणी खुर्द या गावाबाबत आला आहे. सन 1912 कॅ.डॉवेल्स – सर्व्हे ऑफ ओल्ड रत्नागिरी तालुका सिलेक्शन्स फ्रॉम दि रेकॉर्डस ऑफ बॉम्बे गव्हर्नमेंट नं. CXCVII – न्यू सेरिज सन 1912 पृ.232-237