Exiciting offers !
Go social , support us !
Advertise here ! , ID :- AD_TOPMOBLOG101
Per month 125 , Yearly 1500
Welcome / आपले स्वागत आहे
Trending
Advertise here ! , ID :- AD_RIGHTLOG102
Advertise here ! , ID :- AD_BOTTOMMOBLOG102
Per month 125 , Yearly 1500
Introduction / प्रस्तावना
।। श्रीराम ।।
नमस्कार !
Kelkarkul.org या वेबसाईटवर केळकर कुलातील 95 घराण्यांची वंशावळ उपलब्ध करून देताना आम्हाला खूप आनंद होत असून बरीच वर्षे सतत होत असलेली मागणी पूर्ण करण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय व ते काम आमच्याकडून पूर्ण होतंय याचं मोठं समाधान आम्हाला लाभतंय.
या कामासाठी मार्च 1993 मध्ये प्रकाशित झालेला केळकर कुलवृत्तान्त आधारभूत धरला असून तो जसा आहे तसाच संगणकीकृत केला आहे. अपुरी, चुकीची माहिती व मानवी चुका मूळच्या पुस्तकात जशा गृहीत धरल्या आहेत तशा याही कामात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. संगणकाला जी तर्कशुद्धता, गणिती भाषा अपेक्षित असते त्या दृष्टीने मूळ पुस्तकातील काही चुका दुरुस्त करण्याचाही प्रयत्न झालेला आहे. तरीही उरलेल्या चुका-दोषांबद्दल आम्हाला क्षमा करावी ही नम्र प्रार्थना.
हे काम ‘कल्याण डोंबिवली ते कर्जत कसारा’ या दरम्यान असलेल्या केळकर कुटुंबियांचा उपक्रम माहणून हाती घेण्यात आले असून आवश्यक त्या खर्चाची सोय केळकर कुलाच्या डोंबिवली येथील संमेलनासाठी जमवलेल्या निधीतून करण्यात आली आहे. तरीही या पुढील खर्च निभावण्यासाठी सध्या प्रतिकुटुंब/प्रतिवर्ष रू.250/- इतकं सदस्यमूल्य आम्ही निश्चित केलं उसून त्या विषयीची अधिक माहिती श्री.विक्रान्त संजय केळकर यांच्याशी ई-मेल kelkarvikrant7@gmail.com यावर संपर्क साधून मिळवावी.
या कामाची आवश्यकता, त्याचं महत्त्व, मूल्य इ. गोष्टींची चर्चा मूळ पुस्तकातील संपादकीय, निवेदन, प्रस्तावना इ. मधे सविस्तर केलेली असल्याने ते तसंच्या तसं इथे उपलब्ध केलेलं आहे. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर ‘पुस्तक’ हा प्रकार हळुहळु निरुपयोगी, गैरसोयीचा ठरत असल्यानं पुढील पिढीसाठी सहज उपलब्ध व अत्यंत सोयीचा म्हणून ‘संगणक’ हा पर्याय उपलब्ध व अधिकाधिक वापरात असलेला पाहून केळकर कुलाची वंशावळ kelkarkul.org या वेबसाईटवर देण्याचं आमच्या मनात आलं. महिन्यातून किमान एकदा तरी स्थानिक केळकरांनी एकत्र यावं, चहापाणी, गप्पागोष्टी व्हाव्यात, परिचय व्हावा व काही विधायक कार्य हाती घेता यावं या संकल्पनेला मिळालेल्या सक्रिय पाठबळाचं हे फळ असून या कार्यात श्री.विक्रान्त संजय केळकर याचं योगदान अत्यंत भरीव व मोलाचं आहे. वेबसाईट तयार करणं व वंशावळ त्यात भरण्यासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली पूर्णपणे निर्दोष, निर्धोक पद्धतीनं बनवणं हे काम त्यानंच केलं आहे. त्यामुळे त्याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे.
तसंच 95 घराणी व 500 पानं एवढं मोठं पुस्तक संगणकीकृत करण्याचं अत्यंत क्लिष्ट, किचकट काम अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीत करणं किती कठीण आहे हे ज्यांनी अशी कामं हाती घेऊन पुरी केली आहेत त्यांनाच स्वानुभवावरून कळेल. चैतन्य एंटरप्रायझेस, पुणे या संस्थेचे श्री.सुनील तोटे यांनी हे शिवधनुष्य उचललं, लीलया सांभाळून व हे काम वर्षभरात पुरं केलं याबद्दल आम्ही त्यांच्या सदैव ऋणात राहू.
तसंच त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, मदत करणाऱ्या व या कामाचा अखंड पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्थानिक केळकर कुलबांधवांचाही सहभाग कोणत्याही प्रकारे दुर्लक्षिता येणार नाही हे स्वीकारून त्यांच्याही ऋणातच अखंड राहण्याचं आम्ही पसंत करतो.
जानेवारी 2016 च्या केळकर कुल संमेलनात दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ठरल्या. –
2) केळकर कुल वृत्तान्ताचं संगणकीकरण.
कुलस्वामिनी श्री बंदीजाई, कुलस्वामी श्री सोमेश्वर, केळकर कुलातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ, वंदनीय, आदरणीय व्यक्ति शिवाय केळकर कुलवृत्तान्त सन 1952 व 1991 मध्ये सिद्ध प्रकाशित करण्यासाठी झटलेल्या सर्वांना सादर सविनय प्रणाम करून ही प्रस्तावना येथेच थांबवतो. धन्यवाद!
कल्याण (पश्चिम)
Forgot Password ?
Enter your e-mail address below to reset your password.
About us
The surname "Kelkar" is not believed to be derived from another surname nor is it believed to be derived by appending "kar" to the name of a town or village. There is a village named "Kelye" in Ratnagiri Taluka, but there is no evidence in historical tracts or from other information sources to suggest that there is any connection of the surname "Kelkar" with that village. It is believed that the origin of all Kelkars is the village of "Nevre" or a sub-division ("wada") of that village called "Dhokmale". Some say that the original place of residence was Someshwar or Kotwade, but the authors of the Kelkar Kul have not found any evidence to confirm this hypothesis. From Nevre (or Dhokmale), various branches of the Kelkar family migrated to villages across Ratnagiri District of Maharashtra State in India, and they adopted those villages as their "mulgaav" or place of origin. The gotra* of the Kelkars is "Shandilya", the veda** is "Rigveda", the shakha (branch) is "shakal", and the sutra is "Ashwalayan" with three pravar's - Shandil, Asit, and Daival. The kulswami (family deity - god) of the Kelkar family is Someshwar and the kulswamini (family deity - goddess) is Bandijai. However, the deity of the village where each branch of the family took up residence often became the primary family deity for that branch of Kelkars. In our case, the Mahalakshmi of Kelshi is the family deity (kuldevi).
Sources : kelkar.net