केळकर कुल वंशावळीचं संगणकीकरण बर्याच अंशी पूर्ण होत असून ती बघण्यासाठी आपण सदस्यत्व शुल्क ₹१००/-प्रति परिवार प्रतिवर्ष ठरवलं होतं...२०१६च्या जानेवारीत.मागील दोन वर्षातील एकंदरीत महागाई लक्षात घेता ते ₹२५०/- करण्यात आले आहे.
ज्यांनी आपापली वंशावळ पाहिली असेल अशांपैकी काहींकडून एक प्रतिक्रिया अशी आली की ही सुविधा केळकरांना निःशुल्क पुरवण्यात यावी. या संबंधात आम्ही खालील प्रमाणे वस्तुस्थिती सर्वांच्या निदर्शनास आणू इच्छितो....
१) या पूर्वींच्या दोनतीन संमेलनात केळकरकुलवृत्तांताच्या संगणकीकरणाविषयी झालेल्या चर्चेतच असं सांगितलं गेलं की हे अतिशय क्लिष्ट,किचकट,गुंतागुंतीचं,वेळखाऊ काम असून यात आवश्यक ज्ञान असलेला कुणीही केळकरामधे आढळला नाही व बाहेर कुणाकडे ते काम सोपवावं तर ते खूप खर्चिक आहे.
२) हे आव्हानात्मक काम केळकरकुलाच्या कल्याणडोंबिवली ते कर्जतकसारा परिसरातील सदस्यांनी स्थानिक कार्यक्रम म्हणून स्वीकारलं...विधायक व भरीव काम आपल्या हातून व्हावं म्हणून!
३) संकेतस्थळ व तत्संबंधी कार्यप्रणाली इ जरी श्री विक्रांत संजय केळकरने तयार केली असली तरी १९९३साली प्रकाशित झालेला कुलवृत्तान्त त्यात भरणं हे काम करायला ना कुणी केळकरकुलोत्पन्न उपलब्ध होता ना अन्य कोणीही हे काम अंगावर घ्यायला तयार होता.
४) पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे हे क्लिष्ट काम पूर्ण करायला एक संस्था पुढे आली व त्यांनी पूर्वी दिलेल्या अंदाजित खर्चात या दोन वर्षात जवळजवळ दुप्पट वाढ करावी लागली.साधारणतः एक लाख रुपयांच्यावर खर्चाची रक्कम गेली असून त्या व्यतिरिक्त वार्षिक देखभालीचा खर्च आहेच.
५) आजचं वास्तव असं आहे की रु शंभर वा अडीचशे वार्षिक शुल्क भरायला असमर्थ असा कोणीही केळकरकुलोत्पन्न आढळणार नाही.पण असा अपवादात्मक केळकर आढळलाच तर त्याच्या परिस्थितीचा विचार करून योग्य तो निर्णय घेण्याची तयारी तशी स्पष्ट विनंति आली तर आम्ही ठेवली आहे.
६) योग्य काळी ही सर्व व्यवस्था केळकर कुलसंवर्धन न्यासाकडे उभयपक्षी मान्य बाबींच्या आधारे हस्तांतरित करण्याचाही मानस असून या संबंधात योग्य व आवश्यक ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र त्यांना मिळेल.
७) केळकर कुल कल्याणडोंबिवलीपरिसर शाखेचा ही सुविधा तयार करून पुरवण्यात कोणताही व्यापारी,वाणिज्यिक वा निधिउभारणीचा हेतु प्रयोजन इच्छा योजना नसून आमच्याकडे उपलब्ध असलेल्या निधीचा विनियोग केळकर कुलाच्या हितार्थच करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असून आमच्याकडील ज्या केळकरांनी वा तत्संबंधीयांनी या विषयी आपली बुद्धिविचारतर्कशक्ति,अमूल्य वेळ खर्च केलाय....तेही स्वतःची कामं वेळप्रसंगी बाजूला सारून..त्यांचाही योग्य सन्मान राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन अधिकाधिक केळकर परिवारांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावं व या संदर्भातील आपले अनुभव आम्हाला याच माध्यमातून कळवावेत हे नम्र आवाहन !