Foreign travelers and Writers / परदेशगमन व्यक्तिमत्त्वे व लेखक

परदेशगमन व्यक्तिमत्त्वेे

NO NAME GHARANE PIDHI INFO
कै.तात्यासाहेबांच्या या सुविद्य कन्या.
1 कृष्ण गोविंद 1 9 दुसऱ्या महायुद्धात त्यांना आघाडीवर जावे लागले. शत्रुच्या माऱ्यातून सुटका होऊन सुखरुप मायदेशी परत.
10 दत्तात्रय गणेश 9 9 एल.सी.पी.एस. झाल्यानंतर बौंडरी कमिशनचे खास डॉक्टर म्हणून टांगानिकात 3 वर्षे नेमणूक झाली. नंतर तेथेच खाजगी प्रॅक्टीस केली. तेथे सर्जन म्हणून चांगला लौकिक मिळविला.
11 सदाशिव गणेश 9 9 शेतकी विषयाची पदवी घेऊन दक्षिण अफ्रकेत शेतकी खात्यात तीन वर्षे लेट सर्व्हिसेस (उसनवारी नोकरी) साठी गेले होते.
12 पुरुषोत्तम काशिनाथ 9 10 इंजिनिअरिंगची परिक्षा पास झाल्यानंतर त्याविषयात डॉक्टरेट मिळविण्यासाठी इंग्लंड येथे जाऊन आले.
13 नारायण वामन 9 9 इंजिनिअरिंगची परिक्षा पास झाल्यावर त्याविषयांत डॉक्टरेट मिळविण्यासाठी इंग्लंड येथे जाऊन आले.
14 कृष्णाजी वामन 12 12 महायुद्धाचे वेळी रेल्वे-मिलीटरी सर्व्हिसेसमध्ये जाव्हात जाऊन आले.
15 विठ्ठल चिंतामणी 12 10 सन 1888 साली गायकवाड सरकारने शिष्यवृत्ती देऊन बागखात्याचे खास शिक्षण घेण्याकरिता इंग्लंड व इतर युरोपीय देशात धाडले.
16 बळवंत अनंत 14 7 यांनी 20 वर्षे अफ्रिकेत सेक्रेटरीएटमध्ये सरकारी नोकरी केली.
17 श्रीपाद विनायक 16 9 पूर्व अफ्रिकेत टांगानिका टेरिटरीत माइनिंग खात्यात अकौंटंट म्हणून नोकरी केली.
18 उद्धव गणेश 16 11 पर्शियन गल्फमध्ये बहरिन येथे सात वर्ष नोकरी झाली.
19 गोपाळ शंकर 16 10 वैद्यकीय शास्त्रात विशेष प्राविण्य मिळवून, शस्त्रक्रियेतील शिष्यवृत्ती मिळवून यांचे वास्तव्य इंग्लंडमध्ये 2/3 वर्षे झाले व फ्रान्स, इटली, जर्मनी इत्यादी देशातून अभ्यासदौरा केला.
2 यशवंत श्रीधर 1 9 वॉर सर्व्हिसवर परदेशी प्रस्थान.
20 कृष्ण रघुनाथ 27 8 नोकरीनिमित्त पूर्वअफ्रिकेत टांगानिका येथे काही काळ वास्तव्य.
21 माधव रघुनाथ 27 8 टांगानिकांत दारेसलाम येथील इंडियन सेंट्रल स्कूलमध्ये नोकरीनिमित्त परदेशी जाणे झाले.
22 आनंद महादेव 35 8 अमेरिकेत मिशीगन विद्यापीठाचे एम.एस. साठी दोन वेळा जाऊन आले. डेट्राईट येथील क्रिसलरच्या कारखान्यात मोटारी कशा बांधाव्यात यांचे शिक्षण सहा महिने घेतले. म्हणून तेथेही त्यांचे वास्तव्य झाले. सोबत त्यांच्या सुविद्य पत्नी निर्मला याही मास्टर ऑफ सोशल वर्क ची पदवी मिळविण्यासाठी जाऊन आल्या आणि यु.एन.ओ. मार्फत पश्चिम युरोपात आठ महिन्याची निरीक्षण सफर करुन आल्या.
23 कमलाबाई देशपांडे ‘सोळा संस्कार’ या विषयावर प्रबंध लिहिण्यासाठी झेकोस्लाव्हियात जाऊन आल्या.
24 श्री विजय (वासुदेव) विनायक 1 11 टाटा कंपनीतर्फे मध्य आशिया व बांगलादेश येथे नोकरी आणि आबुधाबी, मस्कत येथे नोकरीसाठी जावे लागले.
25 श्री. रघुनाथ विठ्ठल 1 11 गेल्या महायुद्धात 5।। वर्षे मिलिटरीत कॅप्टन होते. प्रोफेसर म्हणुन काम केले. याशिवाय त्यांना इराण व इराक येथे रहावे लागले. डॉक्टरीपेशा असल्यामुळे मिलिटरीत त्यांना बराच मान होता.
26 वसंत शंकर 1 11 इंजिनिअरिंगचे डॉक्टरेट. अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून काम केले. याव्यतिरिक्त मिडलर्स्टमध्ये 100 कन्सल्टन्सी प्रोजेक्ट केले आहेत.
27 आनंद सदाशिव 1 12 उच्चशिक्षित, 1984 साली भारत सरकारतर्फे ‘पोर्ट मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमासाठी इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड देशात गेले होते. पोर्टट्रस्टमध्ये सेक्रेटरीच्या हुद्यावर.
28 अनंत हरि 8 9 बी.टेक. असून एम.एस. साठी यू.एस.ए. त जाऊन अमेरितेच नोकरी करतात.
29 केशव दत्तात्रय 16 10 बी.कॉम. आयर्लंड येथे वास्तव्य. इंग्लंडमध्ये टॅक्स ऑफिसर म्हणन काम केले. पूर्व आफ्रिकेत टांझानियात सरकारी नोकरी.
3 सदाशिव पांडुरंग 1 7 1900-1901 साली इंग्लंड व फ्रान्य येथे अभ्यासदौरा.
30 सुधीर लक्ष्मण 22 6 एम.एस. निष्णात हृदयशल्यचिकित्सक. शिकागो येथील मर्सी हॉस्पिटलमध्ये नोकरी.
31 मकरंद श्रीहरि 23 7 एम.एस्सी. संगणक विज्ञानाची ब्रुकलिन युनिव्हरर्सिटी, न्यूयॉर्क येथील परीक्षा प्रथम श्रेणीत पास. वास्तव्य न्यूयॉर्क येथे.
32 डॉ.बालमोहन गजानन 27 11 पी.एच.डी. (एम.एस.) अमेरिकेत नोकरी निमित्त वास्तव्य.
33 अजित मधुकर 35 - बी.इ. (मेकॅ.) मॅनेजमेंट मास्टर डिग्री घेतली. नोकरी निमित्त जर्मनी, लंडन, स्पेन, फिनलँड येथे जाऊन आले.
34 अतुल गजानन 42 - बी.इ. (मेकॅ.) नोकरीनिमित्त अमेरिकेत कायम वास्तव्य.
35 श्री. व सौ. विश्वनाथ नीळकंठ 44 11 दोघेही ह्युस्टन (टेक्सास) येथे कायम वास्तव्य.
36 वसंत भास्कर 1 11 द. अफ्रिकेमध्ये बोहखाना येथे गोल्डन एरा प्रेसमध्ये नोकरी निमित्त गेले आहेत.
4 प्रभाकर नारायण 8 8 इंग्लंड येथील मावळणकर यांचे सुगंधी कारखान्यांत काम शिकण्याकरिता गेले होते.
5 चंद्रकांत नारायण 8 8 हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती मिळून अमेरिकेतील मिनिसोटा युनिव्हर्सिटीची एम.एस्सी. ची पदवी घेऊन आले.
6 श्रीधर काशिनाथ 9 8 एम.बी.बी.एस. झाल्यावर नॉर्थ केडा, मलाया येथे मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले.
7 गणेश दामोदर 9 8 काच कारखाना चालविण्याच्या दृष्टीने अभ्यास आणि निरिक्षण करण्यासाठी इंग्लांडात जाऊन त्या दृष्टीने शिक्षण घेऊन आले.
8 वसंत विश्वनाथ 8 9 विज्ञान-रसायन विषयाच्या उच्च शिक्षणासाठी परदेशी प्रयाण.
9 गणेश केशव 9 8 1931 साली शेतकी विषयावर मोठे पुस्तक लिहिण्याच्या हेतूने अभ्यास दौरा केला.

सुप्रसिद्ध लेखक

NO NAME GHARANE PIDHI INFO
1 नारायण वासुदेव 1 10 लेखक व कवि ‘रमानाथ’ या टोपण नावाने यांच्या कविता सह्याद्री, महाराष्ट्र-शारदा, विविध-वृत्त या नितकालिकातुन प्रसिद्ध होत. जिवाजी-विजय या काव्यास श्रीम्त जिवाजीराव शिंदे यांनी पुरस्कारा दाखल 1000 रुपये बक्षिस दिले. या व्यतिरिक्त ‘सौंदर्य-मीमांसा’, ‘यशस्वी’, ‘पोस्ट-ऑफिस’, ‘अंतर्नाद’, ‘ग्वालियर राज्य और भारत सरकार’ इ. पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.
2 केशव सदाशिव 1 8 लेखक. ‘तुकाराम चरित्र’ व ‘नेव्हर गेट इल’ ही पुस्तके लिहून प्रसिद्ध केली.
3 केशव गणेश 1 11 लघुकथा व कादंबरी लेखक. अकोला येथील ‘मातृभूमी’ वर्तमान पत्राचे काही काळ संपादक होते. कोहिमा, रोहिणी व लखनौचे दिवस या 3 कादंबऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे पारितोषिके, आकाशवाणी, दूरदर्शन व फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये 33 वर्षांची कारकीर्द झाली.
4 दत्तात्रय वासूदेव 1 9 खालील वर्तमान पत्राचे निरनिराळ्या वेळा दुय्यम संपादक होते. 1) सुमति, वर्धा, 2) महाराष्ट्र, नागपूर, 3) लोकमान्य, मुंबई, 4) ऍडव्होकेट ऑफ इंडिया, मुंबई, 5) फिनॅन्शियल न्यूज, मुंबई, रेवरंड सी.एफ. अँड्र्यूज यांच्या लेखांच्या भाषांतराचे पुस्तक व देशबंधूदास यांचे चरित्र व भाषणे ही पुस्तके लिहीली आहेत.
5 हरि गोविंद 4 6 ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यामुळे बरीचशी विचारसरणी आणि ख्रिस्ती-धर्म प्रचारकाचे कार्य करण्यात घालवले. त्यांनी ‘धर्मतुला’, ‘त्रिवेणी’ व पद्यमाला हे ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले.
6 विश्वनाथ विनायक 8 8 सावरकर वाङमयाची भाषांतरे आणि ‘करुणा’ या बंगाली कादंबरीचा अनुवाद केला आहे. यांचे वर्तमान पत्रात नेहमी चालू घडामोडीवर लेख येत.
7 कमलाकांत वामन 9 9 भूशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे यांनी भूशास्त्र संशोधनात्मक अनेक लेख मराठीत व इंग्रजीत लिहून प्रसिद्ध केले.
8 दिनकर गंगाधर 9 9 सन 1915 पासून काव्यलेखन सुरू केले. त्या कविता ‘अज्ञातवासी’ या नावाखाली प्रसिद्ध केल्या. ‘अज्ञातवासीची’ कविता व ‘अज्ञातनाद’ ही दोन स्वतःची काव्यांची पुस्तके प्रसिद्ध केली. कविवर्य भा.रा.तांबे यांच्या कवितांच्या दुसऱ्या भागाचे संपादक. ऐतिहासिक कागदपत्रांचा बराच मोठा संग्रह त्यांच्या संग्रही आहे.
9 गणेश केशव 9 8 शेतकी विषयात गोडी असल्यामुळे ‘ज्ञानकोशात’ शेतकी विभागाचे संपादक म्हणून बरेच उपयुक्त लिखाण केले. शेतकी विषयक सुमारे दहा ग्रंथ यांनी लिहिले आणि ते सरकारने प्रसिद्ध केले आणि आजही ते ग्रंथ विद्यार्थ्यांचे उपयोगी पडत आहेत. पुस्तक रूपाने प्रवासवर्णन प्रसिद्ध केली आहेत.
10 दामोदर गणेश 9 7 गृहज्योतिष निष्णात आणि त्या विषयावर यांनी ‘आकाशाचे देखावे’ हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले.
11 शंकर विश्वनाथ 16 9 पुणे-वैभव पत्राचे 1890-99 या कालखंडातील संपादक. या पत्रातून त्यांनी सनातन मतांचा पुरस्कार केला. याच पत्रातून समकालीन कै.हरिभाऊ आपटे यांच्या आजकालच्या गोष्टी प्रसिद्ध केल्या.
12 वासुदेव बाळकृष्ण 29 9 इंग्रजीवर प्रभुत्व असूनसुद्धा त्यांनी मराठीतून अत्यंत लोकप्रिय अशी ‘त्राटिका’, ‘वीरमणी’ ही नाटके त्या काळात बरीच गाजली.
13 गणेश हरि 33 8 ‘लोकहितवादी’, ‘शेक्सपीअर’ आणि ‘तुकाराम अभंगाची चर्चा’ इत्यादी ग्रंथांचे लेखक.
14 नरसिंह चिंतामणि 35 7 बराच काळ केसरी-मराठा वर्तमानपत्राचे संपादक. साहित्य क्षेत्रातील प्रत्येक दालनातून त्यांनी आपला ठसा उटविला आहे. ललित लेखन, टीका, नाट्य काव्य, समीक्षा, राजकारणांचे सडेतोड विचार, विविध अभ्यासू लेख, असा त्यांचा साहित्य क्षेत्रातील परिचय देता येईल आणि म्हणूनच जनतेने त्यांना ‘साहित्य सम्राट’ ही पदवी बहाल केली. यांची लेखन संपदा भरपूर आहे. त्यासाठी त्यांचे चरित्रच वाचावे लागेल.
15 श्रीमती गिरिजाबाई केळकर (महादेव चिंतामणी यांच्या भार्या) 35 7 या मराठीतील सुप्रसिद्ध लेखिका असून यांची काही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.
16 मनोहर महादेव 35 8 लेखनाचा वारसा आपल्या मोतश्री श्री.गिरिजाबाई केळकर यांचेकडून मिळाला. महाराष्ट्रातील अग्रगण्य संपादक. पुण्यातील वाङमयशोभा मासिकाचे संपादक व ग्रंथप्रकाशक, प्रकाशन संस्थेमार्फत ‘समग्र केळकर वाङमय’ (खंड 12 पृष्ठे सुमारे 12500) यांनी प्रसिद्ध केले आहे. ‘उपायन’ या पुस्तकाचे लेखक शिवाय मासिकातून अनेक कथा, निबंधाचे लेखन केले आहे.
17 कमलाबाई देशपांडे या सुप्रसिद्ध तात्यासाहेब केळकर यांच्या कन्या. ‘सोळा संस्कार’ या विषयावर प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळविली. ‘स्मरणसाखळी’ पुस्तकाच्या लेखिका तसेच आपले बंधु श्री.यशवंतराव यांचेबरोबर गीत-द्विदल या पुस्तकातून आपल्या कविता प्रसिद्ध केल्या. या व्यतिरिक्त लोकगीत व स्क्षीगीत यावर संशोधन.
18 यशवंत नरसिंह 35 8 हे टिळक महाविद्यालयातून वाङमय विशारद झाले. लेखनाचा वारसा त्यांना तात्यासाहेब केळकरांकडूनच लाभला. सातारा येथील ‘ऐक्य’ वर्तमानपत्राचे उपसंपादक म्हणून काम केले. सन 1935 पासून ‘केसरी’ चे सहसंपादक म्हणन काम पाहिले. हे चांगल्यापैकी कवि आहेत. यांच्या कविता ‘गीत द्विदल’ मधून प्रसिद्ध झाल्या. शिवाय स्वतंत्रपणे ‘गीत गुंफा’ हे स्वतःच्या काव्यांचे पुस्तकही प्रसिद्ध केले. साहित्यातील नाना क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उटविलेला आहे. त्यांच्या लेखन साहित्यांत खालील पुस्तकांचा समावेश आहे. 1) विनोदलहरी, 2) ऐतिहासिक पोवाडे, 3) भूतावर भ्रमण, 4) वसईची मोहीम, 5) तिसऱ्या महायुद्धाच्या झायेत, 6) चित्रमय शिवाजी आणि सर्वात महत्वाचे असे कार्य म्हणजे ऐतिहासिक शब्दकोशाची निर्मिती. ऐतिहासिक विषयक वाहिलेल्या ‘पराग’ या मासिकाचे एक संपादक. पहिल्या कुलवृत्तांताचे एक संपादक.
19 काशिनाथ नरसिंह 35 8 श्री. यशवंतराव यांचे वडील बंधू. वकिली सोडल्यानंतर लेखन व्यवसाय केला. ‘हाच राम तुम्हा आदर्श मानला काय?’ ही पुस्तिका, हिंदु धर्मव्यवहार शास्त्र (बाळूताई खरे यांच्या सहकारितेने), नेपोलियन चरित्र व शमीपूजन ही पुस्तके लिहून प्रसिद्ध केली. आपले पिताश्री तात्यासाहेब यांच्या साहित्याचे बरेचसे प्रकाशन यांनी केले आहे.
20 दत्तात्रय केशव 35 7 यांचे पुढील ग्रंथ लिहून प्रसिद्ध झालेले आहेत. 1) काव्यालोचन, 2) वादळी वारे, 3) संस्कृती संगम, 4) साहित्यविहार. यांचे ग्रंथ युनिव्हरसिटीत पाठ्यग्रंथ म्हणून लावले जातात.
21 शैलजा शिरीष 27 11 बी.ए.एल.एल.बी. वकिली. याशिवाय ‘स्त्री’ मासिकाच्या कार्यकारी संपादिका.